नंदुरबारला कर्तुत्ववान २० महिलांचा सोमवारी सत्कार

नंदुरबार। जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सरकारी, महिला बचतगट आणि भाजीपाला विक्रेता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करण्यार्‍या २० महिलांचा सोमवारी, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील सभागृहात दुपारी १ वाजता सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यता प्राप्त दिग्नाग फाउंडेशन व महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसुमता पंत, अश्विनी ठाकूर, रुपाली गावडे, अनुजा पंडित आदी उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे आयोजन महिला समुपदेशन केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक राहुल जगताप, जिल्हा समुपदेशक पूर्वीशा बागुल, सुमित्रा वसावे, प्रिया वसावे, मयूर माळी आदी परिश्रम घेत आहेत.