नंदुरबारला पुन्हा10 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

नंदुरबार: नंदुरबारला पुन्हा नवीन 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. त्यात शहरातील जामा मस्जिद भागातील रुग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती असून
जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तसेच रनाळे येथील रुग्णांच्या कुटुंबातील 1 व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहे, त्यामुळे नंदुरबार येथील कोरोना
पॉझिटिव्ह रुग्णांनाचा आकडा 60 वर पोहचला आहे. आतापर्यंत 32 जण कोरोना मुक्त झाले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे, सध्याच्या परिस्थितीत 23 कोरोना बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत.
धुळे येथे 2 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या. वेळीच उपचार केल्याने कोविड-19 वर मात करता येते, असा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.