नंदुरबार: जिल्ह्यातील 39 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात नटावद येथील व्यक्तींचाही समावेश आहे. कोरोना संशयीत असलेल्या 83 व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यातील 39 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 19 झाली असून त्यांच्यापैकी शहादा येथील एकाच मृत्यू झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत नंदुरबार येथे 5, शहादा येथे 9 व अक्कलकुवा येथील 4 रुग्ण कोरोनाचे असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.