नंदुरबारातील लाचखोर कनिष्ठ लिपिकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

0
नंदुरबार : वेतनवाढ न थांबण्यासाठी 30 हजारांची लाच मागणार्‍या नंदुरबार जिल्हा परीषदेतील लघू सिंचन विभागाचे कनिष्ठ लिपिकाल अनिल आत्माराम ठाकरे (40) यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी अटक केली होती.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे व पोलीस निरीक्षक संगीता पाटील व सहकारी करीत आहेत.