नंदुरबारातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन

0

नंदुरबार। आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांचे कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापुर व शहादा तालुक्यातील एकूण 33 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात ई 8 वी , ई 11 वी, पदवी व पदव्युतर शिक्षणाकरीता आदिवासी मुलांचे , मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता प्रवेशप्रक्रिया निकाल लागल्यापासून 15 दिवसापर्यंत वसतिगृहनिहाय ऑनलाईन प्रवेश फॉर्म वेब साईटवर ङेस ळप करून स्वत: -लर्लेीपीं उघडून अर्ज भरावा व भरलेल्या अर्जांची प्रिंट कॉपीची प्रिंट गृहपाल यांचेकडे जमा करण्यात यावे असे प्रकल्प अधिकारी, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार नीमा अरोरा, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देणार
ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक असून वसतिगृहात मंजूर संख्येपैकी रिक्त असलेल्या जागेसाठी टक्केवारीनुसार जात निहाय व वर्गनिहाय प्रवेश देण्यात येईल प्रवेश घेणार्‍या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना शासनामार्फत सर्व शैक्षणिक सुविधा, क्रमिक पुस्तके, शैक्षणीक साहित्य, सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, अंथरुन-पांघरुन, वैद्यकिय सुविधा पुरविण्यात येतील. आदिवासी मुला, मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश घेवुन आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल करावे. प्रवेशासाठी पालकांनी संबंधित तालुक्यातील आदिवासी मुला, मुलींचे शासकीय वसतीगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावे असेही कळविण्यात आले आहे.