नंदुरबार : शहरातील एल.के.नगरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याने शहरात खळबळ उडाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम उर्फ सपना महाले (16) ही अल्पवयीन तरुणी कुरकुरे घेण्यासाठी दुकानावर गेली असता अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिचे अपहरण केले, अशी खबर मीराबाई काशिनाथ महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.