आचारसंहितेचे उल्लंघण भोवले ; रीक्षा चालकावर कारवाई
नंदुरबार- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण केल्याप्रकरणी नंदुरबार शहरातील रिक्षा चालक अनिल पुंजू चौधरी यांचेविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी क्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आचारसंहिता भंगाचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
डिजिटल फलक लावणे भोवले
आचारसंहितचे पालन होण्याच्यादृष्टीने नंदुरबार नगरपालिकेमार्फत आदर्श आचारसंहिता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील रीक्षा चालक अनिल पुंजू चौधरी यांनी शिवाजी चौक, नंदुरबार याठिकाणी नगरपालिकेची परवानगी न घेता डिजिटल फलक लावला. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याने आचारसंहिता अंमलबजावणी पथकामार्फत चौधरी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिपेसमेंट ऑफ प्रापर्टी क्ट 1995 चे कलम 5 व महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1995 चे कलम 196 सह कलम व तसेच भारतीय सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पाडणेकामी लावण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन केले म्हणून भा.द.वि. 188 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा फलक जप्त करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली.