नंदुरबारात उन्हाची तीव्रता वाढल्याने जनजीवन विस्कळीत

0

नंदुरबार । शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या उन्हाचा पारा जवळपास 42 अंशावर आल्यामुळे आरोग्यावर परिणाम जाणवु लागला आहे. यंदा प्रथमच कडक उन्हाचा तडाखा बसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा कायम असतो.दुपारी 1 वाजेच्या सुमारास तर सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. जीवाची लाही लाही करून सोडणार्‍या या रणरणत्या उन्हामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. या उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. मळमळ होणे,डोकेदुखी, जुलाब,चक्कर येणे असा त्रास नागरिकांना जाणवत आहे. नंदुरबारचे तापमान 42 अंशा वर पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.