नंदुरबारात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी !

0

नंदुरबार। शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या पेडकाई नगरात चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री ६ ठिकाणी घरफोडी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती दिल्यानंतरही पोलिस उशिरा आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नंदुरबार शहरातील पॉलिटिकनिक कॉलेज परिसरात असणाऱ्या पेडकाई नगरात गुरुवारी रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घातला. रोख रक्कम व दागिने असा एक लाखाच्या जवळपास ऐवज चोरून नेले आहे. या भागातील नागरिकांनी पोलिसांना पहाटे ३ वाजता सूचना दिली. मात्र पोलीस सकाळी ७४५ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. एकाच रात्री ६ ठिकाणी घरफोडी केल्याने चोरांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.