नंदुरबार : शहरातील विमल विहारामध्ये घरफोडी करून चोरांनी सुमारे 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. खोडाई माता रस्त्याला लागून असलेल्या विमल विहारमध्ये राहणारे महेंद्र गोविंद रघुवंशी हे बाहेरगावी गेले होते. याची संधी साधत चोरांनी त्यांच्या घरात डल्ला मारला.
सोमवारी रात्री चोरांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला, तेथून कपाटामधील रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सुमारे 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रघुवंशी हे बाहेर गावाहून आल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.