नंदुरबारात तरुणांच्या दोन गटात हाणामारी ; दोन तरुण जखमी

0

वाहनांचे प्रचंड नुकसान ; उद्यानात आलेल्यांची पळापळ

नंदुरबार- शहरातील सी.बी.गार्डनमध्ये तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी वाहनांचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. हाणामारीत दोन तरुण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विरगुळ्यासाठी गार्डनमध्ये फिरायला येणार्‍या महिला व नागरीकांमध्ये भीती पसरली होती. गार्डनमधील कर्मचारी व फिरायला येणार्‍या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून ही सिनेस्टाईल हाणामारी झाली. यात दोन ते तीन तरुण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील वाघोदा शिवारात सी.बी.गार्डन उभारण्यात आले असून या ठिकाणी महिला, तरुणी, तरुण, लहान मुले फिरण्यासाठी येत असतात, एका विशिष्ट कारणावरून कर्मचारी आणि तरुणांमध्ये हा राडा झाला आहे.