नंदुरबारात तिसर्‍या फेरी अखेर काँग्रेस आघाडीवर

0

काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्नाताई रघुवंशी 1744 मतांनी पुढे
नंदुरबार (रवीद्र चव्हाण) । अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या मानल्या जाणार्‍या नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मतमोजणी कल समोर येण्यास सुरूवात झाली असून तिसर्‍या फेरी अखेर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्नाताई रघुवंशी यांनी 2783 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 11 हजार 458 मते असून भाजचे उमेदवार डॉ. रविंद्र चौधरी यांनी 9 हजार 284 मते आहे. दुसर्‍या फेरी अखेर रत्नाताई रघुवंशी यांनी 1744 मतांची आघाडी घेतली होती. तर पहिल्या फेरीअखेर रत्नाताई रघुवंशी या 675 मतांनी पुढे आहेत. त्यांना 5429 मते होती तर भाजपच्या डॉ.रवींद्र चौधरी यांना 4754 मते पहिल्या फेरीअखेर मिळाली होती. दुसर्‍या फेरी अखेर ही लिड वाढून काँग्रेस 1744 मतांनी आघाडीवर आहे.