नंदुरबार। धर्मजागृती सभेच्या आयोजनाविषयी चर्चा करण्यासाठी विविध हिंदुप्रेमी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या एकत्रित पार पडलेल्या बैठकीत धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा आणि त्यासाठी व्यापक संपर्क अभियान करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुप्रेमी संघटना यांनी नंदुरबार येथील 1/2यारामील कंपाऊंड मैदानावर दि.30 एप्रिल 2017 रोजी धर्मजागृती सभा आयोजित केली आहे. हिंदु धर्मावरील आघात आणि समाज, राष्ट्र व धर्म याची सद्यस्थिती या विषयावर या सभेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ हिंदुप्रेमी कार्यकर्ते चंद्रशेखर बेहेरे, पतंजली योग वेदांत समितीचे एन.डी.माळी, भारत स्वाभिमान न्यासाचे नवनीत शिंदे, युवासेनेचे शहरप्रमुख पंकज चौधरी, योग वेदांत समितीचे विठ्ठल मगरे, विश्व हिंदु परिषदेचे दिलीप ढाकणे पाटील, संत दगा महाराज परिवाराचे मोहनकाका जैन, बंजारा समाजाचे ज्ञानेश्वर बंजारा, अरिहंत गोशाळेचे महेंद्र जैन, हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील, अखिल भारतीय श्री राणा राजपूत संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत आदी मान्यवरांसह विविध व्यायामशाळा, तालीम मंडळाचे व गणेश मंडळांचे पदाधिकारी, समाजसंघटनांचे पदाधिकारी, धर्मप्रेमी बांधव, सर्व हिंदु प्रेमी पक्ष, संघटना, मंडळ, पंथ व संस्था यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपिस्थत होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन
तसेच गोहत्या बंदी कायदा, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, लवजिहाद यासारख्या समस्यांवर आणि धर्मरक्षण याविषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन या सभेतून होणार आहे. सध्या या धर्मजागृती सभेचा प्रचार प्रसार शहराच्या सर्व भागात केला जात असून विविध हिंदु संघटना, पंथ, संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तथापि हा सहभाग अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने चर्चा क रण्यासाठी बैठक नंदुरबार शहरातील मंगल भुवन कार्यालय, गणपतिरोड, नंदुरबार येथे पार पडली. या बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने यासाठी कार्यरत होणे, जास्तीत जास्त कोपरा सभांचे आयोजन करणे आदी निर्णय घेण्यात आले.