नंदुरबारात पाणी भरण्यावरून दोन गटात हाणामारी

0
तिघे जखमी ; परस्परविरोधी तक्रार
नंदुरबार : पाणी भरण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी होवून तीन जण जखमी झाल्याची घटना शहरातील संजय नगरात घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संजय नगरमधील विनोद अमृत मोरे यांची भाची नळावर पाण्याची मोटार लावण्यासाठी गेली असता शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली.
विनोद अमृत मोरे यांच्यासह अश्विनी गडबड भोई, रत्नाबाई गडबड भोई, विमल अमृत मोरे यांना संशयीत आरोपींनी मारहाण केली तर हाणामारीत लोखंडी सळई, लाकडी काठी व चाकूचा वापर करण्यात आला आहे. याबाबत विनोद मोरे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी राहुल ठाकरे, धाकु मराठे, मंगलेश मराठे, रामू मराठे, गोरख मराठे, बापू मराठे, अनिता मराठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या गटातर्फे धाकु तुकाराम मराठे यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी राजेंद्र अमृत मोरे, विनोद अमृत मोरे, अमृत सुपडू मोरे, रत्ना गडबड ढोले, अश्विनी गडबड ढोले यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.