नंदुरबार । येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे बडगुजर समाजाचा स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी हळदी-कुंकू, समाजाची वार्षिक मिटींग तसेच मुला-मुलींसाठी संगित खुर्ची, महिलांसाठी फुगा फुगवून फोडणे, पती-पत्नींसाठी पत्नीने पतीच्या केसांना रबरबॅण्ड बांधणे आदी खेळ घेण्यात आले. सालाबादाप्रमाणे यंदाही नंदुरबार जिल्हा बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे येथील नगर पालिका शाळा क्र.1 येथे हा स्नेहमेळावा झाला.
विजेत्यांना पारितोषिके
शिवजयंतीनिमित्त समाजातील ज्येष्ठ नागरीकांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले. यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. यावेळी महिलांना वाण वाटप करण्यात आले. त्यानंतर मुला-मुलींसाठी लहान-मोठ्या गटात संगित खुर्ची कार्यक्रम झाला. तसेच पती-पत्नींसाठी कपल गेेम घेण्यात आला. यावेळी पत्नीने पतीच्या केसांना रबरबॅण्ड बांधणे हा खेळ घेण्यात आला. त्यानंतर महिलांसाठी फुगा फुगवून फोडणे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला. यावेळी संगित खुर्ची लहान गटात यश दिलीप बडगुजर (प्रथम), वेदांत मिलिंद बडगुजर (द्वितीय) तर दर्शन महेेंद्र बडगुजर (तृतीय), मोठ्या गटात दिपाली मनोहर बडगुजर (प्रथम) राज विजय बडगुजर (द्वितीय) तर राहुल बंडू बडगुजर (तृतीय), पती-पत्नी कपल गेममध्ये सौ.पौर्णिमा अनिल बडगुजर (प्रथम), अश्विनी भिका बडगुजर (द्वितीय), छाया अश्विन बडगुजर, संगिता रविंद्र बडगुजर (तृतीय), महिलांमध्ये फुगे फोडणे खेळ प्रकारात स्वाती मिलिंद बडगुजर (प्रथम), प्रिती गिरीष बडगुजर (द्वितीय), हेमा बडगुजर (तृतीय) आदी विजयी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या बक्षिस देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दिलीप बडगुजर यांनी केले. सुत्रसंचालन पंडीत बडगुजर यांनी केले. सल्लागार भाईदास दगा बडगुजर, उपाध्यक्ष रविंद्र काशिनाथ बडगुजर, सचिव विजय बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, प्रसिद्धी प्रमुख संदीप बडगुजर, दिनेश बडगुजर, अश्विन बडगुजर, विलास बडगुजर, घनश्याम बडगुजर, अनिल बडगुजर, शरदबडगुजर, पंकज प्रभाकर बडगुजर, प्रकाशबडगुजर, प्रदीप बडगुजर, गणेश बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.