नंदुरबारात विवाहितेची जाळून घेवून आत्महत्या

0

नंदुरबार- शहरातील तांबोळी गल्लीत राहणार्‍या एका विवाहित महिलेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांच्या माहितीीनुसार तांबोळी गल्लीत राहणार्‍या शुभांगी विजय तांबोळी (39) या विवाहितीने 31 मे रोजी रात्री अंगावर रॉकेल टाकून स्वताला जाळून घेतले.

त्यात ती 40 टक्के जळाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचार सुरु असतांना रात्री पावणेबार वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ताण-तणावातून तिने जाळून घेत आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. अक्षय विजय तांबोळी यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.