नंदुरबारात शक्तीप्रदर्शनाद्वारे वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचा अर्ज

0

लोकसभा निवडणूक ; डॉ.सुशील अंतुर्लीकर यांचा अखेरच्या दिवशी अर्ज

नंदुरबार- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर सुशील अंतुर्लीकर यांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुशील अंतुर्लीकर यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यांची होती उपस्थिती
भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, नाना ठाकरे, रफत सय्यद, नामदेव येळवे, प्रभाकर सोनवणे, भैय्यासाहेब जाधव, अर्जुन सोलंकी, नितीन कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने आमदार के.सी.पाडवी यांनी काल पुन्हा दोन तर त्यांच्या पत्नी हेमलता कागडा पाडवी यांनी काँग्रेसतर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. आनंदा सुकलाल कोळी यांनीदेखील अपक्ष उमेदवारी दाखल केले आहे.कृष्णा गावीत यांनी भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदीप वळवी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.