नंदुरबारात शिक्षक पात्रता परीक्षेला उशीर : पाच जणांना प्रवेश नाकारला

0
अनेकांना  बसला धक्का : एक महिला परीक्षार्थी चक्कर येऊन बेशुद्ध
नंदूरबार : शिक्षक पात्रता परीक्षेला केवळ पाच मिनिटे उशीर झाल्याने परीक्षार्थींना बसू न दिल्याने अनेकांना धक्का बसला. यातील एक महिला परीक्षार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची घटना एकलव्य विद्यालयाच्या परीक्षा केंद्र आवारात घडली. बेशुद्ध अवस्थेत त्या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील परीक्षा केंद्रांवर 15 जुलै रोजी शिक्षक पात्र ( टीईटी)  परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला मोठ्या प्रमाणावर उमेदवार आले होते. आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या परीक्षार्थींना केवळ 5 मिनिटे उशीर झाल्याने 5 विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश नाकारण्यात आला. त्यातील एक प्रशिक्षणार्थी चक्कर येऊन पडल्याने प्रकृती अस्वस्थ झाली. उपचारासाठी या उमेदवाराला 108 रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्या महिला उमेदवारांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या परीक्षेची वेळ सकाळी 10.30 वाजता होती. उमेदवार 10.35 मिनिटांनी आले त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.