नंदुरबारात शेतकरी संपाचे पडसाद

0

नंदुरबार । राज्यातील शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर उतरण्याचा निर्णय घेतला असून विविध भागात सरकारविरोधी जनक्षोभ उसळलेला असतांना त्याचे पडसाद नंदुरबारातही उमटले. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कांद्याने भरलेला ट्रक अडवून कांदे रस्त्यावर फेकून आंदोलन केले. सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने तसेच विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्री 12 वाजेपासून राज्यातील शेतकर्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणी संपाला गालबोट लागल्याचे दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून दिवसभर बातम्या झळकल्या. दरम्यान, नंदुरबारात खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवापूर चौफुलीजवळून जात असलेला कांद्याने भरलेला ट्रक (क्र. एम.एच.18/एए 9220) अडवून कांदे रस्त्यावर फेकून आंदोलन केले. यावेळी यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना अटकाव केला. रस्त्यावर इसस्तता पडलेली कांदे पोलिसांनी उचलून जप्त केली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, जीवन पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, छोटू पाटील, मोहन पाटील, सुरेश पाटील, परशू पाटील, योगेश चौधरी आदींनी सहभाग घेतला.

तगडा पोलिस बंदोबस्त
राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस विभाग रात्रीपासूनच सतर्क होता. नंदुरबारात देखील आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलींद वाघमारे, तालुक्याचे सुभाष भोये यांच्यासह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नवापुरात तहसिल कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी केली निदर्शने
नवापुर । शहरात आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने तहसिल कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी निर्देशने केली. यावेळी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील आदिवासी कष्टकरी शेतकरी स्त्री, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग उपस्थित होवून त्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतला. वेगवेगळ्या शेतकरी समुदायांशी संबंधीत 25 गटांनी सहभाग घेतला. जवळपास 1200 गावांनी ग्रामसभेचा ठराव करुन संपावर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला होता. सरकारकडुन संपात फुट पाडण्याचे निष्फळ प्रयत्नही सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकयांच्या भाऊबंदकीतल्या भाऊ हिश्याच्या नोंदी तात्काळ करणे, वनहक्क कायद्याप्रमाणे सर्व आदिवासी व इतर जंगलनिवासी स्त्री-पुरुष दावेदारांचे दावे मंजुर करुन त्यांचे कब्जेदार सदर नाव टाकुन 7/12उतारा देणे, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नर्मदा प्राधिकरणाप्रमाणे विशेष व स्वतंत्र यंत्रणेची उभारणी करण्यात यावी. याशिवाय इतरही काही मागण्या काही आंदोलकांकडून करण्यात येत होत्या. निवेदनावर कॉ.रामसिंग गावीत,कॉ.करंणसिंग कोकणी,कॉ.किशोर ढमाले,कॉ.जगन गावीत,कॉ.रणजित गावीत,कॉ.दिलीप गावीत.कॉ.नकटया गावीत कॉ.साजुबाई गावीत,कं.होमाबाई गावीत,कं.ग्वाबाई गावीत,कॉ.जेका गावीत ,कॉ.भिलक्या गावीत,कॉ.रगेश गावीत,कं.कातीलाल गावीत,कॉ.जेंत्या गावीत,कॉ.सिंगा वळवी,कॉ.देवजी वसावे, डॉ.हिरामण महाले,कॉ.प्रभाकर गावीत,कॉ.विक्रम गावीत यांचा सह्या आहेत.कोणताही अणुचित प्रकार होऊ नये म्हणुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचा मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा,संतोष भंडारे,ताथु निकम,पो.का योगेश थोरात,निजाम पाडवी,दिलीप चौरे यांनी चोख बंन्दोबस ठेवला होता.

गरीब व जनतेला न्याय देण्या मध्ये मी शासना पुढे 11 मागण्याचे निवेदन पाठवितो माझा मार्फत गरीब लोंकाना कसा न्याय दिला जाईल यांची मी ग्वाही देतो.
– तहसिलदार प्रमोद वसावे नवापुर

शहादा तालुक्यात विविध संघटनांचा सहभाग
शहादा । राज्यातील शेतकरी आजपासून आपल्या विविध मागण्यासाठी संपावर गेले असून राज्यभर त्यांचे पड्साद उमटत आहेत. शेतकरी राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक झाला आहे. शहादा तालुक्यातील विवीध शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज शहरातील भाजीमार्केट मध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती. काहीशी प्रमाणात परिणाम दिसून आले. भाजी मार्केटमध्ये याचा परिणाम उद्या दिनांक 2 जुन् रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहादा शहरात भाजीपाला बाहेर गावाहून इतर जिल्ह्यांतून येत असतो. तालुक्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात नाही. म्हणून 31 मे च्या आदल्यादिवशीच भाजी मार्केट मध्ये भाजीपाला नेहमी प्रमाणे विक्रीसाठी आल्याने भाजीपाल्याचे लिलाव देखील झाले. परिणामी भाजीमार्केटमध्ये नेहमी प्रमाणे वर्दळ होती. भाजीपाला विक्री केला जात होता. शहरात भाजीपालावाले विक्री करत होते. भाजीपाला भरलेली वाहने दिसत होती. तर कृषीउत्पन्न बाजारसमिती आवारात शुकशुकाट होता. तालुक्यातील सर्व शेतकरी एकाच छत्र छायेखालीआली आहेत. शहादा शहरात भाजीपाला साक्री जळगाव नासिक म. प्र. मधील इंदोर येथून येतो .शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु होण्यापूर्वी 31 मे ला नेहमी प्रमाणे भाजीपाला दाखल झाला होता. सायंकाळी 6 वाजेपासुन वाहने यायला सुरुवात झाली होती. उद्या 2 जून रोजी परिणाम होण्याची शक्यता राहील. बाहेरुन भाजीपाला येण्याची शक्यता कमी राहील अशी माहिती भाजीपाला व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी दिली. शेतकर्‍यांचा हक्कांसाठी त्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा कर्ज् माफ करावे ह्यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून राज्यभर शेतकर्‍यांच्या संप सुरु झाला. शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे त्यांच्या न्यायीक हक्कासाठी नंदुरबार जिल्हा स्वाभिमानी संघटना त्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी प्रतीक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी दिली.

कृउबा समितीत पोलिसांची गस्त
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीनेही आपला व्यवहार बंद ठेउन आपण शेतकर्‍यांचा हितासाठी पाठिशी आहोत. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे. तो स्वाभिमानाने जगला पाहिजे व शेतकर्‍यांचा सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी प्रतीक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनिल सखाराम पाटील यांनी दिली. राज्यभर सुरू झालेले आंदोलन बघता शहरात भाजीमार्केट तसेच कृषीउत्पन्न बाजार समिती परिसरात उपाययोजना म्हणून प्राथमिक स्वरूपात पोलिसांची गस्त चालु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी दिली .