20 कामे कागदोपत्री करून बिले लाटल्याची तक्रार
नंदुरबार- पंचायत समितीच्या सेसफन्ड निधीत 30 लाखांचा घोटाळा करण्यात आल्याची तक्रार गटविकास अधिकार्यांकडे दाखल झाली आहे. सेसफन्ड निधीतून नंदूरबार तालुक्यात 20 कामे केवळ कागदोपत्री करून त्याचे बिले काढण्यात आल्याचा प्रताप बांधकाम विभागाने केल्याचे उघडकीस आले आहे. संगनमताने हा लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून यात अधिकारी सह पदाधिकारी यांचाही सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. याच सेसफन्ड निधीच्या कामांबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे देखील गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल झाली आहे.