नंदुरबार – एसटी आगारातून शनिवारी पहिली बस चार प्रवाशी घेऊन धुळ्याकडे रवाना झाली आहे.
यावेळी पोलिसांचा बंदोबस्तात शहराबाहेर ही बस काढण्यात आली. गेल्या 25 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तो आजही सुरू आहे,परंतु आगारातील एसटी वाहक किरण पवार कामावर रुजू झाले आणि त्यांनी धुळ्यासाठी बस ताब्यात घेऊन रवाना झाले,
प्रचंड पोलीस बंदोबस्ता मध्ये धुळे येथून पहिली बस रवाना झाल्याने ही मोठी घटना मानली जात आहे, प्रवाशांची सेवा करायची आहे म्हणून मी पुन्हा कामावर रुजू झाल्याचं चालक किरण पवार यांचे म्हणणे आहे, तर तर आंदोलक संपकरी कर्मचारी आक्रमक झाले असून संपात फूट पडली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे,