साक्रीरोडवरील भाऊ पेट्रोलपंप परिसरातून शस्त्रास्त्रासह तीन दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
नंदुरबार – साक्री रोडवरील राजेंद्र फार्म या परिसरातील एका बंद बंगल्यावर शस्त्रास्त्रसह दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी उधळून लावला आहे. दबा धरुन बसलेल्या सहा दरोडेखोरांनी पैकी तीन दरोडेखोरांच्या दरोड्याच्या साहित्या एलसीबीने मुसक्या आवळल्या असून इतर तिघे अंधाराचा फायदा घेवून फरार होण्यास यशस्वी झाले. अटक केेलेल्यांमध्ये दोन जण सराईत गुन्हे असून त्यातील एकावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी एलसीबीच्या पथकाला रोख रक्कम व सन्मानपत्र जाहीर केले आहे.
शहरात शनिवारी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक सुरु होती. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना साक्री रोडवरील भाऊ पेट्रोलपंप भागात दरोडेखोर हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीने फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकासह भाऊ पेट्रोल पंप परिसरात दाखल झाले. पथकाची विभागणी करुन शोध मोहिम सुरू केली असता तेथे राजेंद्र फार्म हाऊस परिसरात एक बंद बंगल्याच्या आडोश्याला 6 जण दबा धरून लपून बसल्याचे आढळून आले. यात 6 पैकी 3 तिघांना ताब्यात घेतले व 3 तीन जण अंधाराचा फायदा घेवून फरार झाले.
या दरोडेखोरांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांमध्ये गोट्या बंड्या काळे (वय 24, रा. रासने ता. कर्जत जि. अहमदनगर), सायराफ उर्फ साईराम जाना काळे (वय 35), विक्की पावश्या चव्हाण (वय 19, दोन्ही रा. शेकटा ता. गंगापुर जि. औरंगाबाद ) या तिघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मिरचीपूड, सुती दोरी, 14 इंची लांब धारदार सुरा, 44 इंच लांब लोखंडी टॅमी, 1 करवत पट्टी, लोखंडी गज अशी दरोडा टाकण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरोडा टाकण्यापूर्वी 2 ते 3 लोक येवून खेळणी, प्लॅस्टीकचे फुले, मणी मंगळसूत्र सारख्या वस्तु शहरातील कॉलनीत विक्रीकरून घरांची रेकी करून एकांत बंगले, वस्ती, पेट्रोलपंप अशी ठिकाणे निवडून साथीदारांना बोलवून घेत दरोडा टाकत असतात. या दरोडेखोरांनी बर्याच दिवसांपासून नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर पोलीसांची झोप उडवली होती. तेथील पोलिस त्यांच्या मागावर होते. आरोपी सुरूवातीला खोटे नाव, पत्ते सांगत होते. मात्र, त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करून त्यांचे फोटो औरंगाबाद, पुणे, नाशिक, अहमदनगर येथील माहितगार लोकांना दाखवून खर्या नावाची खात्री केली आहे.
दोन दरोडेखोर सराईत गुन्हेगार
गोट्या बंड्या काळे व सायराफ उर्फ साईराम जाना काळे हे दोन्ही अत्यंत कुख्यात व निर्दयी दरोडेखोर आहेत. गोट्या काळे याचेवर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात खुन, दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असून दौंड पोलीस ठाण्यात मोक्का अन्वये कारवाई झाली असून तेथून तो फरार आहे. तर सायरा काळे याचेवर नाशिक ग्रामीण जिल्ह्यात नांदगाव, पिंपळगाव, येवला तालुका व जायखेडा या पोलिस ठाण्यांमध्ये खुनासह दरोडा, दुखापतीसह दरोडा, दुखापतीसह जबरी चोरी, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असून ते काही गुन्ह्यांमध्ये फरारी आहे.
पथकाला अधीक्षकांकडून बक्षीस जाहीर
पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोहेकॉ विकास पाटील, दिपक गोरे, प्रदिप राजपुत, योगेश सोनवणे, रविंद्र पाडवी, विनोद जाधव, पोना प्रमोद सोनवणे, विकास अजगे, भटु धनगर, संदिप लांडगे, महेद्र सोनवणे, राकेश मोरे, पोशि आनंदा मराठे, अभय राजपुत, सतिष गुले यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीस अधीक्षकांनी या तपास पथकाचे अभिनंदन करून रोख बक्षीस व सन्मानपत्र जाहिर केल आहे.