नंदुरबार : 21 रोजी रात्री शहादा येथील कोरोना पोजिटिव्ह 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले असून नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस हे लॉकडाऊन पासून सतत कार्यरत आहेत जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाख आहे पोलिसांची संख्या फक्त 1658 असल्याने लोकांनी स्वतः ह्या कोरोना वायरस प्रादुर्भाव टाळण्या साठी प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.