शहादा । 22 फेबृवारी 2017 चा शासन निर्णयानुसार बदल्या झाल्या पाहिजेत, 25 जानेवारी 17 सुकाणु समितीचा मोर्चाचे एक दिवसिय वेतन अदा करण्यात यावे , समान काम समान वेतन नुसार 2005 नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकाना जुनी पेंशन योजना लागु व्हावी, ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली पाहिजे आदींसह विविध मागण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी प्राथमीक शिक्षक संघटनचे उपाध्यक्ष दादाभाई पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शिक्षकांनी जिल्हापरिषदेवर मोर्चा काढून संबंधित अधिकारीना निवेदन देण्यात आले.
निवेदनात या आहेत मागण्या
विविध मागण्यांचे निवेदन जि.प.कार्यालयात शिष्टमंडळाने संबंधीत अधिकारीना दिले. निवेदनात सदर मागण्या करण्यात आल्या. यात 22 फेबृवारी 2017 चा शासन निर्णयानुसार बदल्या झाल्या पाहिजेत. 25 जानेवारी 17 सुकाणु समितीचा मोर्चाचे एक दिवसिय वेतन अदा करण्यात यावे, समानकाम समान वेतन नुसार 2005 नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकाना जुनी पेंशन योजना लागु व्हावी, ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली पाहिजे. चटोपाध्याय व निवडश्रेणी जाचक अटी रद्द कराव्यात, धडगाव तालुक्यातील शिक्षण विभागातील वाढत्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्या आहेत.
यांची होती उपस्थिती
नंदुरबार जिल्हापरिषद कार्यालयावर 18 नोव्हेंबरला नंदुरबार येथील नवापुर चौफुलीला दुपारी 2 वाजेपासुन मोर्चा दादाभाइंचा पिंपळे यांचा नेतृत्वाखाली व मोर्चाचे सयोजक किशोर मगरे, संतोष कुवर, प्रभाकर खैरनार, बलवंत देवरे, तुळशीराम पानपाटील, शाकीर खाटीक, शिवाजी पावरा, लक्ष्मण कोळी, रघुनाथ बैसाणे यांचा प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला. जिल्हाभरातील शिक्षक या मोर्च्यात सहभागी झाले होते.