शहादा:-
नंदुरबार लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अंतर्गत ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत ठेकेदाराने शहादा तालुक्यात तीन कामे पूर्ण केली आहेत. या कामांची बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंत्याने 95 हजारांची मागणी केली होती. त्यानुसार 19 हजार 500 रूपयांची लाच स्विकारतांना नंदुबार येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद कार्यालय कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ,सदर कारवाई झाल्याने शहादा पंचायत समिती कार्यालयात स्मशान शांतता पसरली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, लघु पाटबंधारे विभाग जि.प.नंदुरबार अंतर्गत पंचायत समिती शहाद्याचे कनिष्ठ अभियंता दिनेश केशवराव पाटील (आलोसे) यांनी तक्रार यांच्याकडून सदरच्या बिले काढण्यासाठी 95 हजारांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने वेळोवेळी 75 हजार रूपये इतकी रक्कम आलोसे यांना दिली. उर्वरीत रक्कम 20 हजारांसाठी तगादा लावला होता मात्र तडजोडीअंती 19 हजार 500 रूपये लाच स्विकारतांना आढळून आला आहे. सदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक माधवी एस.वाघ, पोहवा.विलास पाटील, पोहवा.अमोल मराठे, मपोहवा ज्योती पाटील, पोना.देवराम गावित, नावाडेकर, पोना.मनोज अहिरे यांच्या पथकाने केली आहे.