नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला विविध वैद्यकीय साहित्य भेट

0

नंदुरबार। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्‍व मानव रुहानी केंद्रातर्फे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला विविध वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या साहित्याची रुग्णालय प्रशासनाला मोठी मदत होणार आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत मदतीचा हात पुढे करण्यात विश्व मानव रुहानी केंद्र नेहमीच अग्रेसर असते. 

कार्यक्रमाचे आयोजन विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखा नंदुरबार व वासदरे यांच्यातर्फे करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय साहित्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाकडून मदत होत असली तरी विश्‍व मानव केंद्राकडून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला तीन स्ट्रेचर व चार व्हीलचेअर देण्यात आले. साहित्य रुग्णालयाचे अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी.सातपुते, डॉ.नरेंद्र खेडकर, मनोहर खैरनार, हिरालाल दाते आदींनी स्विकारले. यावेळी विश्‍व मानव रुहानी केंद्राचे सेवेेकरी उपस्थित होते.