नंदुरबार जिल्हा संगणकीय 7/12 चावडी वाचनात राज्यात अव्वल

0

शहादा। डिजीटल इंडिया भूमी अभिलेखा आधुनिक कार्यक्रम सात बारा संगणिकरण करून त्याच्यात त्रुटी राहू नये याची पडताळणी करून येणार्‍या पिढीस जागृता येणार आहे. संगणीकरण सात-बारा चावडी वाचनात जिल्हा प्रखम स्थानावर असल्याचे प्रतीपादन पर्यटन व रोजगार हमी योजनाचे मंत्राी ना.जयकुमार रावल यांनी केले. तालुक्यातील अवगे गावात जिल्हाचे पालकमंत्राी ना. रावल यांच्या उपस्थितीत चावडी वाचनाचा कार्यक्रम झाला आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.डॉ. हिना गावित, आ.उदेसिंग पाडवी, जिप सदस्य जयपाल सिंह रावल ,पं.स.सभापती दरबारसिंह पवार,सीईओ घनशाम मंगळे, प्रांत लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसिलदार मनोज खैरनार, बिडीओ श्रीराम कांगणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ किशोर पाटील, जितेंद्र जमदाळे , दिनेश खंडेलवाल, सरपंच सखुबाई भिल, नायब तहसिलदार डॉ उल्हास देवरे आदि उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना पोहचविणार
पालकमंत्री ना.रावल यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजीटल भारतासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहित गावातील महत्वाचा दुवा म्हणून तलाठी याच्याकडे महत्व होते. आता प्रत्येक नागरीक जागृत झाला आहे. डिजीटल क्रांती मुळे संगणिकीय सात-बारा उपलब्ध करणे सहज शक्य झाले आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत केंद्रच्या, राज्यांच्या विविध योजना-लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ऑनलाईनमुळे शेतकर्‍यांच्या खिशात 7/12
सर्व कारभार आता संगणकीकरण करून लोकांच्या हातात देण्यात आले. संगणकीय सात-बारामुळे येणारी पिढील पिढी जागृत राहणार आहे. माझी जमिन, माझी जागा तीचा हक्क ना तहसिलदार ना तलाठी यांच्याकडे असणार आहे. पुर्वी शेतकरीच्या खिशात पाकिट असे आता ऑनलाईनमुळे मोबाईल राहणार राज्यभर कुठेही गेल्यास मोबाईल राहिला तर आर्थीक चणचण भासणार नाही. दुय्यम निबंधक कार्यालय तहसिलदाराशी जोडणार असल्याचे ना. रावल यांनी सांगितले.

भविष्यात कर्ज माफी
शेतकरी कर्जमाफी मागत आहे. मात्र सरकार शेतकर्‍यांची इंचन इंच जमिनसाठी जलयुक्त शिवार माध्यमातून पाणी, वीज पोहचविणार आहे. भविष्यात कर्ज माफी होणार आहे. संगणकीय सात-बारा काढून शकतकर्‍यांचे नाव बरोबर आहे का याची खात्री करावी. एक ऑगस्ट पासून सर्वच सात-बारा संगणकीय होणार. संगणकीय सात-बारा चावडी वाचन प्रकियेत जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत तर नाशिक विभागात शहादा तालुका प्रथम असल्याचे ना. रावल यांनी केले. सुत्रसंचालन नायब तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांनी केलेे.