नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यास तीव्र आंदोलन

0

राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचा ईशारा ः फैजपूर प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन

फैजपूर- जळगांव जिल्ह्यातील आदिवासींना नंदुरबार जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयातून तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे फैजपूर प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. निवेदनाचा असा की, नंदुरबार जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात बबिता गिरी आल्यानंतर जळगांव जिल्ह्यातील आदिवासींना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एक वर्ष उलटून ही आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जळगांव जिल्ह्यातील सातपुडा रांगेत वास्तव्य करणार्‍या आदिवासींना तात्काळ नंदुरबार जात वैधता कार्यालयातून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पी.सी.धनगर यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देतांना राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अजीत एन.तडवी, रावेर तालुकाध्यक्ष ईकबाल तडवी, यावल तालुकाध्यक्ष फिरोज तडवी, रावेर तालुका सचिव अकील रुबाब तडवी, फैजपूर शहराध्यक्ष हकीम अयमत तडवी, उपाध्यक्ष मोहसीन फकिरा तडवी, अमित सुभेदार तडवी, जिल्हा उपाध्यक्ष शरद आनंदा भालेराव, यावल तालुका सचिव परेश राजेश तायडे, गोटू शित्रू तडवी, सायबू तडवी, मुबारक अलाबक्ष तडवी, जावेद ईस्माईल तडवी, लतीफ महंमद तडवी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.