नंदुरबार। तळोदा-शहादा मतदार संघातील भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांच्या सावत्र बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. राधा पाडवी असे आमदार पाडवी यांच्या बहिणीचे नाव आहे. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कौटुंबिक तणावातून हे पाऊल उचललेलं असल्याचे सांगितले आहे. शहर पोलिसांनी जबाब घेतला असून तो तळोदा पोलिसांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आला आहे.