नंदुरबार जिल्ह्यात जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन

0

शहादा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पुजन जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मुख्याधिकारी सुधीर गवळी, पोलीस उपनिरीक्षक लतिफ तडवी, पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत, जिल्हा सचिव पृथ्वीराजसिंह राजपुत, तसेच नगरसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष दिनेश नेरपगार, शहर अध्यक्ष मनोज बिरारी, शहर सचिव संतोष संगपाळ, शहर उपाध्यक्ष कौस्तुभ मोरे, दिपक खेडकर, यश वाडीले. विक्की चौधरी, तालुका सचिव अंबरनाथ महाले, तालुका उपाध्यक्ष मनोज पाटील, विजय खलाणे, सुरेश माळी यांनी कामकाज पाहिले.

आदिवासी गोर नृत्याने मिरवणुकीत वेधले लक्ष
रयेतचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 387व्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत आदिवासी गोर नृत्यात सादर येवून गुलालाची उधळण करण्यात आली. शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत आदिवासी वेशभुषा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. मिरवणूकीची सुरूवात 4 वाजता विधीवत पुजा करून झाली. याप्रसंगी तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, जिल्हा उपप्रमुख धनराज पाटील, माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, तालुका अध्यक्ष मधुकर मिस्तरी, मोते सर, बापु चौधरी, उत्तम पाटील, नगीन निकुंभ, पुरूषोत्तम कुंभार, सागर पाटील, दिलीप पाटील, राजेश जेठे, योगेश भाये, प्रशांत नायक, प्रविण सैंदाणे, नगो निकम, रतिलाल पाटील, रतन बागुल आदी मिरवणूकीत सहभागी झाले होते. या मिरवणूकीचे वाघर्डे येथील आदिवासी गेर नृत्य कलाकारांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.