नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2017 या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षेतखाली सभा नुकतीच झाली. या सभेस जि.प. अध्यक्षा रजनीताई शिरिष नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.हर्षद लांडे आदी उपस्थित होते.
जागतिक स्तनपान सप्ताह ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील सर्व आशा अंगणवाडी, सेविका, आरोग्य सेविका यांच्या मार्फत कार्यक्षेत्रातील 0 ते 6 महिने वयोगटातील सर्व बालकांच्या मातांना स्तनपान करण्याच्या पध्दती तसेच प्रसूतीनंतर अर्ध्या तासानंतर स्तनपान केल्यास बाळाला आईच्या दुधात असलेल्या कोलेस्ट्रममुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती नाईक यांनी सांगितले, नंदुरबार जिल्हयातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व अर्भक व बालमृत्यू कमी करण्यासाठी मातांनी आपल्या बाळाला प्रसूतीनंतर लगेच स्तनपान करण्याचे आवाहन केले.