शहादा : आज अक्कलकुवा येथील एक 58 वर्षीय पुरुष आणि शहादा येथील एका 15 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. नंदुरबार जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे. ५२ व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.