नंदुरबार :जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी कोरोनाचे एकही रुग्ण नव्हते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यातील रजाळे येथील एक जण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज एकाच दिवशी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. रजाळे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच २ जिल्हा रुग्णालय कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
नागरिकांनी दक्षता बाळगावी. आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. अनावश्यक बाहेर फिरू नये आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे. रजाळे येथील रुग्णांची संपर्क साखळी बारकाईने शोधण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.