नंदुरबार जिल्ह्यात शेतकर्‍यांचा ठिय्या

0

नंदुरबार । शिवसेनेने शेतकर्‍यांना पाठींबा देण्यासाठी बंदची हाक दिली होती. त्या आधारावर नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी आंदोलनात भाग घेवून नंदुरबार-धुळे रस्त्यावरील रनाळा परिसर हा पूर्णपणे वाहतुकीस बंद करण्यात आला. या आंदोलनात शेतकर्‍यांनी बैलगाड्यांचा वापर करुन रस्त्यावरती बैलगाड्या सोडून देण्यात अ1ाल्या. तसेच गवतेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रस्त्यावर झोपून सरकारचा निषेध व्यक्त केला. सकाळी 8.30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांच्या विरोधी सरकार असल्याची भावना यावेळी गवते यांनी कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली. पूर्णपणे सातबारा कोरा झाला पाहीजे. प्रत्येक शेतकर्‍यांला न्याय मिळाला पाहीजे, आश्‍वासन नको तर अंमलबजावणी करा, असे ठिय्या मांडून रास्तारोको केला. हजारो वाहने अडून पडली. तब्बल चार तास रोड बंद केल्यामुळे नंदुरबार-धुळे रोड पूर्णपणे बंद पडला. नंदुरबारचे डीवायएसपी रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. व त्यांच्या मध्यस्तीने मार्ग मोकळा करण्याची त्यांनी विनंती केली. त्यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांनी लेखी स्वरुपात शेतकर्‍यांनी निवेदन डीवायएसपींना दिले. यावेळी डीवायएसपींनी सांगितले की, आम्ही लागलीच आपल्या भावना मंत्रालयापर्यंत पाठवू, आपण आता आंदोलन थांबवावे व रस्ता मोकळा करावा, तब्बल चार तासांनी रस्ता मोकळा करण्यात आला. तसेच रनाळा परिसर पूर्णपणे बंद होवून व्यवहार दुकानाबंद करुन ठेवलेत. त्या परिसरातील व्यापार्यांनी देखील आंदोलनाला पाठींबा देवून आपापली दुकाने बंद ठेवली. यावेळी पंचक्रोशितील हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनात माजी सरपंच महेश सांगळे, उपतालुका प्रमुख संतोष पाटील, योगेश सानप, गणेश शिंदे, नाना पाटील, भैय्या पाटील, दिलावर पाटील, आबा आढाव, बबलू नागरे, संदीप गुळे, पांडुरंग गवते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

‘महाराष्ट्र बंद‘ रोजी दिलेल्या निवेदनात या मागण्या
5 जून 2017 सोमवार रोजी महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला नवापुर तालुक्यातील शेतकयांचा जाहीर पाठींबा .महाराष्ट्रातील शेतकयांच्या संपुर्ण कर्जमाफी व विजबील माफी व इतर मांगण्यासाठी आज महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनाच्या कोरकमिटीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आव्हान केलेले आहे.बंदच्या आंदोलनाला नवापुर तालुक्यातील शेतकरी सामील होऊन शेतकयांच्या रक्त पिपासु सरकारचा तिव्र निषेध आम्ही करीत आहोत शेतकयांच्या वतीने व कोरकमिटीच्या वतीने खालील मांगण्या मान्य करण्यासाठी निवेदन सादर करीत आहोत आमच्या प्रमुख मागण्या- 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमी भाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागु करावी, दुधाला प्रति लीटर 50 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागण्या आहे.

नवापूर शहरात शेतकरी बंदमध्ये एक जण भाजला
नवापुर । महाराष्ट्र बंदला नवापुर तालुक्यातील शेतकर्‍यांनी नवापुर शहर बंद केले होते. सकाळपासून शेतकरी वर्ग शहरबंद करण्यासाठी एकत्र आले होते. यात मच्छीमार्केट भागात पाववडाची लाँरी लावणारा शंकर गंगाराम गावीत व त्यांचाकडे कामाला असणारा दिनेश रत्ना वळवी (वय 22) हे दुकान बंद करीत असताना गँस शेगडीवर तेलाची कडाईत काही शेतकर्‍यांनी पाणी टाकल्यामुळे ते तेल या दुकांदाराचा अंगावर पडुन दोघेे जखमी झाले आहे. त्यात दुकांनावर काम करणारा दिनेश वळवी (रा. खांडबारा हा इसम 35 टक्के भाजला गेला. यानंतर नवापुर तालुक्यातील सर्व शेतकरी मिळुन तहसिलदार प्रमोद वसावे व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना निवेदन दिले. निवेदनावर शेतकरी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक,पं.स उपसभापती दिलीप गावीत, आर.सी.गावीत, न.पा गटनेते गिरीष गावीत, जालमसिंग गावीत, रोबिन नाईक, माजी नगरसेवक विनय गावीत, रतनजी गावीत, संजय मावची, आरीफ पालावाला, संजय पाटील, ईश्वर गावीत, रमेश गावीत, दत्तु मावची, राहुल गावीत, अनिल वसावे, प्रविण गावीत, दौलत कोकणी, प्रेमजित कोकणी, राजेश गावीत, जालमसिंग गावीत, सुरेश गावीत, सुका गावीत असे असंख्य शेतकर्‍यांचा स्वाक्षर्‍या आहेत. आज संपुर्ण नवापुर शहर कडकडीत बंद होते चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, संतोष भडारे, दिपक पाटील, पो.कॉ. निजाम पाडवी, मोहन साळवे, दिलीप चौरे, किरण धनगर, योगेश थोरात यांचासह कडक बंन्दोबत लावण्यात आला होता.

ग्रामीण कष्टकरीतर्फे तहसिलदारांना निवेदन
तसेच सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा वतीने तहसिलदार प्रमोद वसावे यांना निवेदन देण्यात आले. 1 जुन पासुन शेतंकयांनी आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात पुकारलेल्या संपास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभतर्फे पुर्णपणे पाठिंबा देऊन रस्त्यावरची लढाई सुरु केली आहे. निवेदनावर रामा गावीत, रंजित गावीत, जगन गावीत, दिलीप गावीत, रमेश गावीत, शातीबाई गावीत, गेवाबाई गावीत, जेत्या गावीत, इसया गावीत, राजु गावीत, सुदाम गावीत, नवग्या गावीत, दावजी गावीत, कातीलाल गावीत, रमिलाबाई गावीत, सुर्माबाई गावीत, सकाराम गावीत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बंदला शहादा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद
शहादा । शेतकर्‍यांनी शेती कर्ज माफीसह विविध मागण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला शहादा तालुक्यात माञ संमिश्र प्रतिसाद मिळाला सप्ताहातील पहिला दिवस असल्याने नेहमिच गजबजणारा तहसिल, पुरूषोत्तम मार्केट. बसस्थानक, पालीका शाँपींक मार्केट, मेनरोड, तुपबाजार भागात सुनसुनाट दिसत होते दुपारनंतर माञ व्यापारी वर्गाने दुकाने उघडली होती. सोमवार 5 रोजी महाराष्ट राज्य बंद ठेवण्याचा निर्णय स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना व पक्षांनी पाठींबा दर्शविला आहे. आठवड्याचा आज पहिला दिवस असतांना सुद्धा शहरातील मेनरोड, जनता चौक, पालीका शाँपींग, बसस्टँड परीसर, काजी चौक कृषी उत्पन्न बाजार, पुरूषोत्तम मार्केट, खरेदी विक्री संघाचे गाळे सुरभी कॅम्पलेक्स, बाँबे बाजार.भाजी पाला मार्केट, पटेल मार्केट, शेरेपंजाब काँम्पेक्स यासह लोणखेडा गावातील व्यापारी गाळे सकाळ पासुन बंद होते. या व्यापारी गाळ्यात दररोज ग्राहकांची भाऊ गर्दी होसे. मात्र शेतकर्‍यांनी पुकारलेल्या बंदास संमिश्र प्रतीसाद मिळाला आहे शेतकरी शेतमजुर यांचे हक्कास व्यासपीठ कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे आवारात शूकशुकाट वातावरण होते. दिवस भर एकहि शेतकरी शेतमजुर हमाल व्यापारी हे फिरकले नाहित. भाजीपाला मार्केट सकाळपासुन नियमित सुरू होते. होलसेल किरकोळ व्यापारीवर्गाने भाजीपाला विक्रीसाठी गाळे थाटले होते. बंदचा प्रतीसाद भाजीपाला भावावर 2 ते 7 टक्केने वाढला होता. भेंडी, गड्डा कोबी, कोखंबीर, गवार, मेथी, शोपालक, भोपळा, हिरवी मिरची, शेवगा शेंगा, कांदे, बटाटे, वांगीसह लिंबू या मालावर रू.1 पासून भाव वधारला होता. सकाळी शहरातील दुकानेबंदसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनाचे जिल्हा अध्यक्ष घनःशाम चौधरी, वसंत पाटील यासह कार्यकर्ते शहरातुन फिरत होते. कायदा सुवेवस्थेचा दृष्टीने शहरात उपपोलीस अधिक्शक महारू पाटील, शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बडगुजर, संजय चव्हाण, निलीमा सातव, नेरकर, अंकुश बोरारे यांसह पोलीस बंदोबस होता. शहरातील काजी चौक जनता चौक, बसस्टँड समोर या प्रमुख ठिकाणी पोलीसांच्या गाड्या बंदोबस्तासाठी उभी होती. शहरातील व्यापारी दुकानदार यांनी स्वयंम स्फुर्तीने व्यापार व्यवस्ता बंद ठेउन संमिश्र प्रतीसाद दिला.बंदचा फटका किरकोळ विक्री वर झाला. लोकांनी सकाळी किरकोळ माल डोक्यावर ठेउन विक्री स आनला आज बंद मुळेशेतक- यास दिवस भर रखडत माल परत न्यावा लागला आहे. खरीप हगीमाची लगबग सुरू झाली आहे. त्यातच शेतकरीनी संप पुकारला असून बंदचा दिवसी औषधालय वकृषी सेवा केंद्र उघडी असल्याने शेतकर्‍यांंनी खरीप लागवडीसाठी लागणारे बी बीयाने दुकाने वर एकच गर्दी केली होती.