नंदुरबार जिल्ह्यात 17 रुग्ण कोरोना बाधित

0

शहादा:नंदुरबार जिल्ह्यात 105 रुग्णांपैकी 100 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 5 रूग्ण बाधित आहेत. यात शहाद्यातील 4 तर अक्कलकुवा येथील एक जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात मयत धरून 17 कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. शहादा शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहचली आहे. येथील 44, 48, 65 वर्षाचे पुरुष आणि 12 वर्षाच्या मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. चारही बाधित रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याने आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाने उशिरा वैद्यकीय तपासणी केल्याने संसर्ग वाढला आहे. रमजानच्या महिन्यात नागरिकांनी बाहेर पडू नये. लक्षणे दिसताच त्वरित रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती त्वरित द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.