नंदुरबार जि.प.कर्मचारी पतसंस्थेची कार्यकारिणी जाहिर

0

नंदुरबार । जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची धुळे व नंदुरबार जिल्ह्याची एकत्र पतसंस्था कार्यरत होती. या पतसंस्थेचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र पतसंस्था कार्यान्वीत करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या सभासदांची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम चेअरमनपदी अनिल वसावे तर व्हा.चेअरमनपदी रोहिदास पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणीतील उर्वरित सदस्यांची निवड
पतसंस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यपदी अनिल वसावे, बापु धनगर, सुभाष मारनार, लालु पावरा, मंजुषा मावची, हिम्मत वंजारी, जगदीश पाटील, अभयसिंग चित्ते, योगेंद्र पाटील, सुरेखा वळवी, संजय बहिरम, ज्ञानेश्‍वर बोरसे, रोहिदास पवार, जितेंद्र अहिरे, नरेंद्र सैंदाणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. या सदस्यांमधुन चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीसाठी येथील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जि.प.कर्मचारी पतसंस्थेच्या प्रथम चेअरमनपदी अनिल वसावे तर व्हा.चेअरमनपदी रोहिदास पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी एक मताने निवड केली. पतसंस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शहादा शाखाध्यक्षपदी बापु धनगर तर तळोदा शाखाध्यक्षपदी सुरेखा वळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले. पतसंस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त चेअरमन वसावे यांनी दिली.