नंदुरबार। राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यात नंदुबारसह धुळे, अकोला, वाशिमचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी या चारही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबबत पत्र पाठविले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचा कालावधी ३० डिसेंबर तर पंचायत समितीचा कालावधी २८ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यासाठी कालावधी वाढविण्यात आला आहे.
पुढील कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे कामकाज सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुसार या चारही जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य राहतील असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद वर प्रशासक बसण्याची वेळ टळली आहे. नागपूर जिल्हा परिषदेला देखील अशीच मुदत वाढ देण्यात आली आहे.