नंदुरबार । तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते खोलले आहे. मुदत संपलेल्या 23 ग्रामपंचायतसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले. काल मतमोजणी होऊन ग्रामपंचायत निहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात बाह्यने, बळवंड, होळतर्फे रनाळे, कोरीट, समशेरपूर वावद, पिंपळोड, उमर्डे, लोणखेडा, जाम्भी पाडा, बोराळे, गुजर जांभोळी, अडची, नासिंदा, भागसरी, सुजलापूर, इसईनगर, केसरपाडा, आक्राले, सैताने, जुनमोहिडे, कलमाडी, धमदोड या गावांचा समावेश होता. उमर्डे ग्रामपंचायतवर अपक्ष सरपंच निवडून आला आहे. तर कलमाडी येथे शिवसेनेचा सरपंच निवडून आले आहेत. इतर ग्रामपंचायत वर भाजप व काँगेसचा दावा सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्याने जाहीर करण्यात आलेल्या निकालातून राजकिय समीकरण जुळविले जात आहे.