नंदुरबार नगरपालिकेत 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

0
भाजपचे गटप्रमुख डॉ.रवींद्र चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप
नंदुरबार : शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून नंदुरबार नगरपालिकेत 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप भाजपचे गट प्रमुख डॉ.रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी खासदार हिना गावित, पालिकेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवंदकर, भाजपाचे शहर अध्यक्ष मोहन खानवाणी, नगरसेवक आनंदा माळी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ, रवींद्र चौधरी यांनी नगर पालिकेत झालेल्या गैरव्यवहाराचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर करून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निशाणा साधला.