नंदुरबार न.पा.च्या सभापतींची निवड जाहीर !

0

नंदुरबार :नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी दीपक दिघे, शिक्षण समितीच्या सभापती ज्योती पाटील, स्वच्छता वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या सभापतीपदी शारदाबाई ढडोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्याणी मराठे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी कैलास पाटील, यांची एकमताने निवड करण्यात आली.

नियोजन आणि विकास समिती भारती राजपूत या पदसिद्ध सभापती राहणार आहेत. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष रत्ना ताई रघुवंशी यांची निवड करण्यात आली. मंगळवारी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली.