नंदुरबार । अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरासह परिसरात मंगळवार 29 आगस्ट रोजी मुसळधार पाऊस बरसला. नंदुरबार येथे एका कारवर झाड पडल्याने नुकसान झाले. एका गणपती मंडळाचा मंडपही कोसळले. धुव्वादार पाऊस झाल्याने पिकांना चांगले जीवदान मिळाले असून शेतकरी सुखावला आहे. नंदुरबार परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावासाने दडी मारली होती मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. सहा तास झलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.
शहादेकर सुखावले
शहरातील जुने न्यायालयाजवळ उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळून नुकसान झाले. एका मंडळाचा मंडप कोसळल्याने कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. शहादा येथे 49 टक्के पाऊस सकाळपासून शहरात पावसाचे आगमन झाले. गणपती बाप्पाला निरोप देण्याचा आज पहिला टप्पा जणु यासाठीच वरुण राजाने हजेरी लावली आहे. शहादा शहरात केवळ 49 % पावसांची नोंद झाली आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून श्रावणसरी सारखा पाऊस येत असल्यांने शहादेकर सुखावले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी डबके साचले आहेत. यामुळे वाहनधारकांची व वाटसरुंची चांगलीच तारांबळ होत आहे. भाद्रपद सुरु झाला असुन श्रावणी असल्यासारखे वातावरण तयार झाले आहे. आटलेल्या बोअरवेल पुन्हा सुरु होतील अशी चिन्ह आहेत .