नंदुरबार बंदला प्रतिसाद

0

नंदुरबार (प्रातिनिधी) – अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी जागृती नामदेव पावरा हिने १८ जानेवारी रोजी वसतिगृहातच गळफास घेतला असून तिचा मृत्यू संशयास्पद आहे. यास प्राचार्य, महिला अधीक्षक व प्रशासन जबाबदार आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच घटनेचा निषेध म्हणून आदिवासी संघटनेचा वतीने नंदुरबार बंद ची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल शहरात बंद पाळण्यात आला. दरम्यान, काही ठिकाणी वादामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

पोलिसांचा बंदोबस्त
मलकवाड्यात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता, शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणाव ग्रस्त बनले होते, याची कुणकुण लागल्याने पोलिस उपअधीक्षक रमेश पवार हे कर्मचार्यांसह दाखल झाले, त्यांनी जमावास समजूत घातल्याने वातावरण निवळले, पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.दरम्यान पद्मवत चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी आज राजपूत समाजा च्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे, परंतु अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही,

या संघटनांचा सहभाग
आदिवासी महासंघ, एकलव्य आदिवासी क्रांती दल, जय आदिवासी ब्रिगेड, एकलव्य आदिवासी संघटना भिल्लीस्थान टायगर सेना, भिम लायन सेना,गौतम बुद्ध युवा सोशल संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट) तर्फे बंदची हाक देण्यात आली आहे.त्यानुसार शहरातील प्रमुख बाजार पेठ, नेहरु चौक, सुभाष चौक, मंगळ बाजार, जळका बाजार, अंधारे चौक, इलाही चौक, मन्यार मोहल्ला, सिंधी कॉलनी, करण चौफुली, गिरीविहार गेट परिसर, धुळे चौफुलीसह सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले. सकाळ पासूनच व्यापारी, दुकानदार तसेच सर्व सामान्य नागरीकांनी बंद ठेवून सहभाग नोंदविला.