नंदुरबार भाजपचे प्रतोद प्रविण चौधरी यांचे निधन

0

नंदुरबार । नगरपालिकेचे नगरसेवक व भाजपचे प्रतोद प्रवीण बापू चौधरी यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रवीण बापू व त्यांच्या पत्नी एकाच प्रभागातून निवडून आले होते. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलाचा विवाह आहे. शनिवारी दुपारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आला व यात त्यांचे निधन झाले. या घटनेने मित्रपरिवार व चौधरी समाज सुन्न झाला आहे.