नंदुरबार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

0

वैंदाणे गावात कारवाई ; 18 हजारांची लाच घेतान अटक

नंदुरबार- शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक निलेश चव्हाण यांना 18 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्यासह पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. नंदूरबार तालुक्यातील वैंदाणे गावातील एका शेतकर्‍याचे काम करून देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. वैंदाणे गावातच आरोपी लाच घेण्यासाठी आल्यानंतर पथकाने आरोपी निलेश चव्हाण यास अटक केली. या कारवाईमुळे लाचखोर अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.