नंदुरबार येथे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत सामुहिक बुद्धवंदना

0

नंदुरबार । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरात ठिकठिकाणी प्रतिमा पूजन, महाप्रसाद वाटप, सामुदायीक बुद्धवंदना आदी कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील साक्रानाका परीसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामुदायीक बुद्धवंदना कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील गुरूकुल नगर परिसरात असलेल्या जेतवन महाबौद्ध विहारात सकाळी 9 वाजता बौद्धवंदना घेण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजीक या विषयावर प्रा. डॉ. राजेश मेश्राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीनवकार्यांवर प्रा. डी. एस. सोनवणे, प्रा. प्राची कुळकर्णी, शरदभाई यांचे प्रबोधनात व्याख्यान झाले. बसपाच्या वतीने ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. इंदिरा मंगल कार्यालय सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी किशोर ढमाले यांनी संविधान वाचविण्यास संघटीत होण्याचे आवाहन केले. एकंदरीत शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

समता सप्ताहाचा समारोप
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 8 ते 14एप्रिल याकालावधीत सामाजिकसमतासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात झाला. यावेळीआमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, उपायुक्त माधव वाघ, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.याकार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.