नंदुरबार येथे शुक्रवारी जगदंबा देवीची मिरवणूक

0

नंदुरबार । होलीकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात श्री महिषासुरमर्दींनी जगदंबा देवीची मिरवणूक 17 मार्च रोजी काढण्यात येणार आहे. होलीकोत्सवानिमित्त देवीची मिरवणूक काढण्याची परंपरा नंदुरबार शहरात असून 17 मार्च रोजी कमान दरवाजा येथून सायंकाळी 7 वाजेपासून मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत जगदंबा देवीची मिरवणूक निघेल. गणपती मंदीराजवळ आल्यानंतर या ठिकाणी महिषासुर आणि जगदंबा देवीची टक्कर होईल. ह दृष्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. महिषासुरचा वध झाल्यानंतर रंगपंचमीला सुरूवात होत असते.