नंदुरबार । समाजवादी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रऊफ शेख व महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव कल्पना गंगवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. आगामी पालिका निवडणूतिच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. सोबत धुळे कार्याध्यक्ष महानगरचे गोरख शर्मा, डॉ.सेल अध्यक्ष बी.यु. पवार, महिला शहर अध्यक्षा डॉ.दिपा नाईक आदि उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेटी-गाठी घेतल्यानंतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नंदुरबार नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पार्टीने कंबर कसली असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, संपर्क प्रमुख रऊफ शेख यांचे उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर
समाजवादी पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी गुलाम रसुल बागवान, जिल्हा उपाध्यक्षपदी करीम मोईनोद्दीन शेख, युवाजन सभेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहसीन रऊप मोमीन, उपाध्यक्ष आफताफ खान युसुफ खान पठाण, महिला जिल्हाध्यक्षपदी रेहाना गनी खाटीक, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी इशरत जुल्फेकार सैय्यद (अ.कुवा), जिल्हा सचिवपदी इम्रानखान गफ्फारखान, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी आत्माराम ईशी, अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी रऊप बलोच, नंदूरबार शहराध्यक्षपदी शफी शेख रफिक कुरेशी आदींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात करण्यात आले. यावेळी आझादशा बाबनशा, पदमसिंग जव्हरी, अन्नपुर्णा पेंढारकर, जुबेर पत्रकार, शहादा येथुन फारूख शेख तमीज, सलमा शेख रहिम आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.