संशयीतीला अटक ; लोहमार्ग पोलिसांनी नोंदवला गुन्हा
नंदुरबार- कुटुंबियांसोबत रेल्वे स्थानकावर नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या तीन वर्षीय बालकाचा अपहरणाचा प्रयत्न सतर्क नातेवाईकांमुळे फसला तर या प्रकरणी संशयीतास अटक करण्यात आली. जुन्या सिंधी कॉलनीतील गिरीश नानकानी हे त्यांच्या तीन वर्षीय मुलगा आदित्यसह नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेू होते. प्लॅटफार्म क्रमांक दोनवर सर्व जण उभे असताना 11.30 वाजता गाडी आल्यानंतर नातेवाईक गाडीत सामान ठेवत असताना उदयकुमार छोटेलाल दास (30,ग्रामनदियाकी, ता.काको, जेहानाबाद, बिहार) या संशयीताने आदित्यला उचलून पळ काढला. कुटुंबियांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड करीत संशयीताला पोलीस व प्रवाशांच्या मदतीने पकडले. उदयकुमार यास अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.