नंदुरबार रोटरी क्लबतर्फे इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

0

नंदुरबार। येथील रोटरी क्लबतर्फे शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणेश मुर्ती तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेत 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नंदुरबार रोटरी क्लबतर्फे गुरुवार 17 ऑगस्ट रोजी येथील डी.आर.हायस्कुल प्रांगणात शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीष खुंटे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष यशवंत स्वर्गे, अध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, सचिव पंकज पाठक, सदस्य अनिल अग्रवाल, डॉ.दुर्गेश शाह, हिरालाल महाजन, डॉ.निर्मल गुजराथी, माजी अध्यक्ष जितेंद्र सोनार, श्रीकांत बोडस, उमेश दवे, कैलास मराठे, विशाल मच्छले आदी उपस्थित होते.

सहभागींना प्रमाणपत्र, भेटवस्तूचे वाटप
कार्यशाळेत नाशिक येथील तज्ञ मार्गदर्शक अजय वैद्य यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. आजच्या इंटनरेट, व्हॉटस्अपच्या युगात रमणारा विद्यार्थी वेगळे काही कला व क्रीडा याची आवड निर्माण व्हावी हा हेतू या कार्यशाळेचा होता. कार्यशाळेत सलग चार तास विद्यार्थ्यांनी वेळ देवून उत्साहाने व आवडीने शाडू मातीच्या गणेश मूर्त्या बनविल्या. कार्यशाळेत 60 विद्यार्थी, 3 शिक्षक, 2 रोटरी सदस्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांबरोबरच काही विद्यार्थीनींही आपला सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविल्या. कार्यशाळेसाठी डी.आर.हायस्कुलचे शिक्षक राहुल पाटील, देवेंद्र कुलकर्णी, आशिष कापडणे, यांनी सहकार्य केले.