नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात 8 टक्के मतदान

0

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांनीही बजावला हक्क

नंदुरबार- लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील मतदान केंद्रांवर कमालीचा उत्साह दिसून आला. सकाळी-सकाळी मतदानासाठी सुशिक्षित मतदार बाहेर पडल्याने 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाले. दरम्यान, बोहल्यावर चढण्यास आधीच तळोदा तालुक्यातील दलेलपुर येथील दिव्या वसंत पाडवी या वधूने तसेच शिरपूर तालुक्यातील वाडी येथील राजू भिवा भिल या वराने बोहल्यावर चढण्यास आधीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या उन्हाचा पारा 44 अंशापर्यंत असल्याने अनेक मतदारांनी सकाळीच घराबाहेर पडून मतदान केल्याचे चित्र दिसून आले.